मराठी व्याकरण || Marathi Vyakaran

default-logo

Essay Writing In Marathi In 2020 Easy Method For Exams

essay writing in marathi

Essay Writing In Marathi Is Called As Nibandhlekhan (निबंध लेखन).

I Have Given Video On How to Write Marathi essay Bellow. Marathi Letter Writing

essay writing meaning for marathi

MPSC Book LIst By Topper

  • More Networks

Majhi Marathi

  • Marathi Quotes
  • Success Story
  • Today इतिहास

निबंध कसा लिहावा

Essay Writing in Marathi

आपल्याला मराठीचा वार्षिक पेपर म्हटला कि निबंध लिहणे अनिवार्यच राहते मग त्या मध्ये आपल्याला कोणत्या पण विषयावरती निबंध येऊ शकतो जसे कि राजकारण, नेत्यांबद्दल माहिती आणि अशे बर्याच प्रकारचे विषय तुम्हाला परीक्षेमध्ये निबंध लिहण्यासाठी येऊ शकतात. तर प्रत्येक निबंध कसा लिहावा, त्या मध्ये कोणत्या गोष्टी बदल सांगाव निबंधाची लांबी किती असावी या सर्व गोष्टी निबंधाच्या विषयावरती अवलंबून असतात.

स्पर्धा परीक्षा आणि शालेय निबंध या मध्ये खूप जास्त फरक आहे. शालेय निबंधामध्ये तुम्हाला फक्त दिलेल्या विषयावरती २०० ते २५० ओळी लिहाव्या लागतात. आणि त्या मध्ये पण ठराविक माहिती. पण जर स्पर्धा परीक्षांच्या निबंधाबद्ल बोलायचे म्हटले तर या मध्ये खूप साऱ्या गोष्टीचा समावेश असतो. या मध्ये तुम्हाला परीस्थितीचे आकलन, उपाययोजना, समस्येचे आकलन या सर्व गोष्टींचा विचार करावा लागतो. आम्ही तुमच्या साठी घेऊन आलो आहोत काही खास टिप्स ज्या तुम्हाला तुमचा निबंध आणखी सुंदर बनवण्यास मदत करतील. चला तर मग सुरु करूया.

निबंध कसा लिहावा – How to Write Essay in Marathi

How to Write Essay in Marathi

निबंधाचा विषय किंवा मुद्दा जाणून घ्या

आपल्याला कोणत्या विषयावरती लिहायचा आहे ,त्या बदल आपल्याला काय काय माहिती आहे . आपण कोणत्या गोष्टी त्या मध्ये लिहू शकतो या सर्व गोष्टी आपल्याला निबंध लिहण्याआधी जाणून घ्यायच्या आहेत .

निबंधाची सुरवात आकर्षक असावी

जेव्हा पण तुम्ही निबंध लिहण्यासाठी सुरवात करतात तेव्हा त्याची सुरवात आकर्षक असायला हवी जेणेकरून समोरील व्यक्तीच्या मनात समोरील निबंध वाचण्यासाठी उत्सुकता निर्माण झाली पाहिजे . सुरवातील जास्त खोडतोड करू नये, निबंध लिहताना तुमचे अक्षर सुंदर आणि आकर्षक असले पाहिजे .

पुढील भागात निबंधाच्या विषयाची सुरवात करावी

या मध्ये तुम्हाला दिलेल्या विषयावरती तुम्हाला असलेली सर्व माहिती व्यस्तीत रित्या मांडायची आहे . या भागाला “The body of an easy ” असे म्हटले जाते कारण इथूनच तुमच्या निबधातील विषयाला खरी सुरवात केली जाते. या मध्ये तुम्हाला सर्व माहिती तुमच्या पद्धतीने मांडायची असते . या मध्ये तुम्हाला किती प्याराग्राफ लिहावे याची मर्यादा नसते तुम्हाला प्रत्येक नवीन विचारासाठी एक स्वतंत्र प्यारा तयार करू शकता .

निबंधाचा शेवट नेहमी चांगला ठेवावा

तुम्ही संपूर्ण निबंधात काय लिहल आहे त्याचा आशय हा शेवटी तुमचा शब्दात लिहायला हवा त्या मध्ये ठळक गोष्टी बदल माहिती भरपूर आणि महत्वाचा आशय या मध्ये लिहायला हवा कारण निबंधाचा शेवट आणि सुरवात याला खूप बारकाईने वाचले जाते .

निबंधाची लांबी वाढवण्यासाठी चुकीची माहिती लिहू नये

तुम्हाला जे लिहायचे आहे त्या बदल योग्य माहिती नसेल तर ते लिहू नका या मुळे तुम्हाला कमी मार्क भेटू शकतात . तुम्हाला असलेली सर्व माहिती बरोबर आहे याची आधी खात्री असेल तरच ती माहिती तुम्ही लिहा .

Editorial team

Editorial team

Related posts.

MSCIT कोर्स बद्दल संपूर्ण माहिती

MSCIT कोर्स बद्दल संपूर्ण माहिती

आजच्या 21 व्या शतकात सर्व माहितीची देवाण-घेवाण हि डिजिटल होत आहे, सर्वकाही ऑनलाइन होत आहे. माहिती हि डिजिटल फॉर्म मध्ये...

महिलांसाठी बेस्ट करिअर ऑप्शन

महिलांसाठी बेस्ट करिअर ऑप्शन

आज प्रत्येक क्षेत्रात महिला ह्या पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून पुढे जात आहेत, आजकाल अस एकही क्षेत्र नाही कि ज्यामध्ये महिला...

MS Excel म्हणजे काय?

MS Excel म्हणजे काय?

MS-Excel आपल्या कॉम्प्युटर मध्ये बरेच अशे सॉफ्टवेयर असतात, जे आपण खुप जास्ती प्रमाणात वापरतो, व ते आपले काम खुप सोप्पे...

Copyright © 2016-2024, MajhiMarathi.Com, All rights reserved

निबंध कसा लिहावा – How to Write Essay in Marathi

Table of Contents

How to Write Essay – निबंध कसा लिहावा

कुठल्याही स्तरावर भाषा शिकताना, प्रश्नपत्रिका सोडवताना कमी-अधिक लांबीचा निबंध लिहिणे अनिवार्य असते. एखादा विषय कितपत समजला आहे. स्वतःच्या भाषेत त्यावर मुद्देसूद विचार मांडता येत आहेत का, गोंधळून न जाता विषयानुरूप विचार, मते, प्रसंग, भावना यांचे वर्गीकरण करून ते क्रमवार, सुसूत्रपणे उलगडता येत आहेत ना; हेच निबंधातून पाहिले जाते.

स्पर्धा परीक्षांसाठी निबंध लिहिताना अर्थातच निबंध लेखनाची काठिण्यपातळी वाढत जाते; वाढत जायला हवी. शिक्षणामुळे अनुभवाकडे पाहण्याची आपली दृष्टी प्रगल्भ बनत असते, जाणिवा समृद्ध होत असतात, वृत्ती डोळस बनत असतात.विचारांनाही नवी झळाळी मिळत असते. त्यामुळे या सगळ्याचे प्रतिबिंब आपल्या निबंधातूनही उमटायला हवे.

त्यामुळेच एकाच विषयावरचा शालेय पातळीवरचा निबंध आणि स्पर्धा परीक्षांमधला निबंध यात जमीन-अस्मानाचा फरक हवा. शिवाय, स्पर्धा परीक्षांमधून उत्तीर्ण होऊन पुढे तुम्हाला प्रशासकीय सेवेत रूजू व्हायचे असते. अशावेळी परिस्थितीचे नेमके आकलन, समस्येचे गांभीर्य, त्याबद्दलची मतमतांतरे, उपाययोजना, त्यावरचे स्वतःचे स्पष्ट मत, याविषयीचे चौफेर भान असायला हवे असते. निबंध लेखनातून टप्प्याटप्प्याने, तर्कसंगत मांडणीतून एखाद्या निर्णयापर्यंत का आणि कसे जायचे याचेही भान तुम्हाला यानिमित्ताने यावे, ही अपेक्षा असते.

निबंधलेखनामध्ये आत्माविष्काराला मोठा वाव असतो. विचारांतील तर्कशुद्धता, शब्दांवरची हुकमत, कमी वेळात सुव्यवस्थितपणे मांडलेले विचार, वाचन, बहुश्रुतता अशा अनेक पैलूंचे दर्शन घडविण्याची संधी निबंधातून मिळते.जणू आपले व्यक्तिमत्त्वच निबंधातून प्रकट होते. विचार सुचण्यासाठी अनुभव उत्कटपणे घेण्याची आवश्यकता असते. तीच गोष्ट सूक्ष्म निरीक्षणाची. आपल्या पंचेंद्रियांचा उपयोग जागरूकपणे करायला हवा.

काही अनुभव आपण प्रत्यक्ष घेतो, तर काही वाचनातून मिळवता येतील. विविध प्रकारच्या वाचनातून आपल्याला विचारांचा, कल्पनांचा खजिनाच हाती लागतो. त्याचा निबंधलेखनासाठी कसा उपयोग करता येईल, याचा थोडा विचार करूया.

कोणत्याही प्रकारच्या निबंधाचे मुख्यतः दोन भाग पडतात.

1) पहिला भाग म्हणजे त्या निबंधाचे मुद्दे किंवा त्याचा आशय

2) दुसरा भाग म्हणजे त्या आशयाची मांडणी म्हणजेच निबंधशैली.

निबंधाचा आशय आणि शैली या दोन्ही दृष्टीने जो निबंध उंची गाठू शकतो, तो उत्तम ठरतो. मुद्दे चांगले आहेत; पण मांडणी ढिसाळ, अनाकर्षक असेल, तर निबंध सकस पण बेचव, कंटाळवाणा होईल आणि नुसताच भाषेने, अलंकारांनी सजवलेला पण ठोस आशय नसलेला निबंध खमंग, पण निःसत्त्व ठरेल.

जेव्हा आपण निबंधाचा विषय वाचतो. तेव्हा त्या विषयाशी संबंधित अनेक विचार, कल्पना, अनुभव, आठवणी,प्रसंग आपल्या मनात गोळा होतात. या सगळ्यातून निबंधासाठी कोणते मुद्दे महत्त्वाचे आहेत व कोणते गाळले तरी चालतील, हे निबंधाची शब्दमर्यादा लक्षात घेऊन ठरवायला हवे; कारण निबंधासाठी असलेली शब्दमर्यादा पाळणे या आवश्यक असते.

त्यामुळे कोणत्या मुद्दयाचा सविस्तर विचार करायचा व कोणते थोडक्यात मांडायचे, ही दोन्ही आत्मसात करायला हवीत. अर्थात, त्यासाठी सराव महत्वाचा. निबंध लिहिताना निवडलेल्या मुक्ष्यांचा क्रम डोळ्यांपुढे आणून एकातून एक विचार, कल्पना उलगडत जातील, या पद्धतीने या मुद्यांची संगती लावायला हवी निबंध वाचताना त्यातील सलगता जाणवायला हवी.

निबंधाचा दुसरा भाग म्हणजे निबंधाची मांडणी, शैली! आपले विचार, भावना, समर्पक व मोजक्या शब्दांत व्यक्त करता यायला हव्यात .

शब्दरचना व वाक्यरचना जमण्यासाठी विशेषणे, क्रियाविशेषणे, वाक्प्रचार, म्हणी, सुभाषिते, सुविचार यांचे भांडार आपल्याजवळ भरलेले हवे. अवांतर वाचन केलेले असले की, आपल्याबीनिबंधातील आशय ची समृद्धी तर वाढतेच; पण वेगवेगळे लेखक कसे शब्द वापरतात, कशी मांडणी करतात, याच्या परिचयातून आपली स्वतःची शैली विकसित होत जाते.

आवश्यक असे शब्द सहजपणे कागदावर उमटू लागतात. यासाठी वाचनाची साधना हवीच! अवांतर वाचनामध्येही सातत्य व विविधता असायला हवी. दैनंदिन वृत्तपत्रांमधील बातम्यांबरोबरच माहितीपूर्ण, वैचारिक लेख, पुस्तकांमधील चरित्रे, प्रवासवर्णन, ललित निबंध, इतिहास, वैचारिक साहित्य असे विविध प्रकारचे साहित्य वाचायला हवे.

समस्याप्रधान निबंध लिहायचे असतील तर, आपल्या देशाच्या, समाजाच्या स्थितीचा अभ्यास वृत्तपत्र वाचनातून व्हायला हवा. त्याचबरोबर जे वाचले त्याची नोंद करून ठेवायला हवी. निबंधाच्या विषयाशी संबंधित नुकत्याच घडलेल्या घटनांचे संदर्भ देता यायला हवेत. आपले विचार, आपल्याला सुचलेल्या कल्पना टिपून ठेवायला हव्यात.

वाचलेली सुभाषिते, काव्यपंक्ती यांचा वापर योग्य प्रमाणात करायला हवा. अन्यथा विषयाला कृत्रिमता येते. विषयाच्या संदर्भात सर्वसामान्य विचारांबरोबरच आपला खास वेगळा ठसा उमटवणारा मजकूर त्यात आला, तर असा निबंध खूप परिणामकारक ठरू शकतो.

निबंधाच्या मांडणीशी संबंधित अजून एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे निबंधाची आकर्षक, योग्य सुरुवात आणि सकारात्मक समारोप!

वेगळा ठसा उमटवणारा मजकूर त्यात आला, तर असा निबंध खूप परिणामकारक ठरू शकतो. निबंधाच्या मांडणीशी संबंधित अजून एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे निबंधाची एखाद्या प्रसंगातून नुकत्याच घडलेल्या एखाद्या घटनेचा संदर्भ घेत; निबंध विषयासंबंधात कुतूहल जागे होईल, निबंध वाचायची उत्कंठा निर्माण होईल, अशी निबंधाची सुरुवात असावी.

पण ‘नमनालाच घडाभर तेल अशी अवस्था होत नाही ना, याबद्दल जागरूक असावे.

सुरुवातीची चांगली कल्पना किती तपशीलवार मांडायची. ?

निबंधाची शब्दमर्यादा लक्षात घेऊन ठरवावे, निबंधाचा शेवट करतानाही आशादायी, समस्या निवारणाच्या दिशेने जाणार उपाययोजना सुचवणारा, भविष्याबद्दल मंगल चित्र रंगवणारा असावा, समस्या किती का असेना, ती निवारण्याचे बळ तुम्हा तरुणाईच्या मनगटात नक्कीच आहे, हे निबंधातून जाणवायला हवे. या विभागाचे आणखी एक महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे प्रस्तावना.

Leave a Comment Cancel reply

visionmarathi.co.in

Writing skills types:तुमच्या वाचकांना गुंतवून ठेवण्यासाठी ४ लेखन शैलींचा वापर करा

Table of Contents

लेखनाच्या चार मुख्य शैली कोणत्या?| What are the 4 types of writing style with examples?

सामान्यत: आपण जे लेखन करतो मग त्यामध्येही बरेच प्रकार असतात. The University of Rhode Island च्या एक लेखानुसार जगात ४ प्रकारचे लेखन (Writing Skills) आढळते. 

१) Persuasive-मन वळवणारे:

शक्यतो ह्या प्रकारच्या लेखनामद्धे लेखक एखाद्या विशिष्ट स्थितीची किंवा युक्तिवादाची(Argument) वैधता(validity) वाचकाला पटवून देण्याचा प्रयत्न करीत असतो. 

उदाहरणार्थ; शिफारसपत्रे(Letter Of Recommendations),आवरण पत्र(Cover Letters),संपादकीय वृत्तपत्र लेख(Editorial), शैक्षणिक पेपरसाठी युक्तिवादात्मक निबंध(argumentative)

1) पुस्तकात: अ पीपल्स हिस्ट्री ऑफ द युनायटेड स्टेट्स, हॉवर्ड झिन द्वारा लिखित. हा युक्तिवादाचा मजकूर असे स्पष्ट करतो की United States ची जी कथा लोकांना केवळ त्याच्या संस्थापक व राष्ट्रपतींमुळे माहीत आहे ती त्यांच्या पुरती मर्यादित नसून कामगार वर्ग, विविध वर्णनाचे लोक, इतर उपेक्षित गट ज्यांनी न्याय आणि समानतेसाठी लढा दिला आहे त्या सर्वांची आहे. २) न्यूजपेपर: Editorial: The Need for Universal Basic Income in India (The Hindu): हे एडिटोरियल असा युक्तिवाद समोर घेऊन येते की सर्व नागरिकांना मूलभूत उत्पन्न प्रदान केल्याने गरिबी दूर होईल आणि अर्थव्यवस्थेला चालना मिळेल.

२) Narrative-कथात्मक:

वर्णनात्मक लेखन म्हणजे कथा सांगणे.यामध्ये आपण स्वत: काल्पनिक गोष्टी तयार करून महत्वाच्या सामाजिक मुद्द्यावर वार करू शकतो.अथवा जीवनात वास्तवात घडलेल्या गोष्टी देखील सांगू शकतो.

तुम्हाला माहीत आहे?- Malgudi Days, R.K. Narayan यांची प्रसिद्ध कादंबरी ,रवींद्रनाथ टागोर यांची “गीतांजली”,अरविंद अडिगा लिखित “द व्हाईट टायगर” यांसारख्या प्रसिद्ध कथा या Narrative ह्या लेखन स्टाइल मध्ये मोडतात.

Writing skills types:तुमच्या वाचकांना गुंतवून ठेवण्यासाठी 4 लेखन शैलींमध्ये प्रभुत्व मिळवा

३) Expository-विवरनात्मक:

एक्सपोझिटरी किंवा विवरणात्मक ही एक अशी लेखनशैली आहे ज्याचे मुख्य उद्दिष्ट माहिती देणे,व पुरव्यासाहित ती स्पष्ट करणे आहे. त्या लेखनात लेखक दाव्यांचे समर्थन करण्यासाठी तथ्ये, पुरावे आणि डेटाचा वापर करतात. उदाहरणे: कसे करायचे/How-To, यांसारखे लेख, पाठ्यपुस्तके, बातम्या (Editorials किंवा Op-Eds नाही) , तांत्रिक किंवा वैज्ञानिक लेखन. तर येथे आपल्या ह्या पूर्ण लेखाचा गाभा आहे. म्हणजेच टेक्निकल रायटींग ही विवरणात्मक ह्या कॅटेगरी मध्ये येते.

उदाहरणार्थ;

” जीवशास्त्र/Biology: हायस्कूल जीवशास्त्र पाठ्यपुस्तक: हे पाठ्यपुस्तक विविध जैविक प्रणाली, अवयवांची कार्ये आणि विविध वैज्ञानिक प्रयोगांची माहिती स्पष्ट आणि संघटित पद्धतीने सादर करते.

“Scientists Discover a New Planet in a Nearby Solar System” (सायन्स न्यूज वेबसाइट वरुन घेतलेला संदर्भ): ही बातमी नवीन ग्रहाच्या शोधाबद्दल अहवाल देते, त्याचा आकार, स्थान आणि शोधण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या पद्धतींबद्दल तपशील प्रदान करते.

Writing skills types:तुमच्या वाचकांना गुंतवून ठेवण्यासाठी 4 लेखन शैलींमध्ये प्रभुत्व मिळवा

४) Descriptive-वर्णनात्मक:

साध्या भाषेत सांगायच झालं तर शब्दांचा वापर करून चित्र तयार करणे. कथा जिवंत करण्यासाठी या प्रकारचे लेखन आपल्या संवेदनांचा – दृष्टी, स्पर्श, गंध, श्रवण आणि अगदी चव यांचा वापर करते. जणू तुम्ही एखादा चित्रपट बघत आहात. जणू लेखकांना तुम्ही त्या कथेचा भाग आहात असे जाणवून द्यायचे असते.

तुम्हाला माहीत आहे? – J.k.Rowling यांचे हॅरी पॉटर सारखे वर्णनात्मक लेखन ह्याच विभागात मोडते. रोलिंग त्यांच्या शब्दांसह ज्वलंत चित्रे रंगवते, ज्यामुळे वाचकांना हॉगवॉर्ट्सच्या जादुई जगाची, डायगन ॲलीच्या गजबजलेल्या रस्त्यांची आणि चित्तथरारक क्विडिच सामन्यांची कल्पना करता येते. वर्ण, प्राणी आणि जादूचे वर्णन देखील कथेत खोलवर भर घालतात.

तथापि, हॅरी पॉटर पूर्णपणे वर्णनात्मक नाही: तर ही कथांची मालिका इतर लेखन शैलीचा देखील पुरेपूर वापर करते. यामध्ये Narrative,Expository,Dialogue या सर्व मिक्स शैलींचा उपयोग झाला आहे.

Narrative/कथा: हे स्पष्ट कथानक, पात्रे, कथेची रचना आणि संघर्ष व्यक्त करते. Dialogue/संवाद: पात्रांमधील संभाषणे कथानकाला पुढे नेतात आणि व्यक्तिमत्त्वे प्रत्यक्षात उभी करतात. Expository/एक्सपोझिटरी: मालिका जादूचे नियम, जादूगार जगाचा इतिहास आणि जादू आणि औषधांचे तपशील स्पष्ट करते. त्यामुळे, हॅरी पॉटरच्या यशात वर्णनात्मक लेखन हा मुख्य घटक आहे, परंतु एक समृद्ध आणि आकर्षक कथा तयार करण्यासाठी ते इतर शैलींसह मिश्रित आहे.

Writing skills types:तुमच्या वाचकांना गुंतवून ठेवण्यासाठी 4 लेखन शैलींमध्ये प्रभुत्व मिळवा

नक्की वाचा 

ffective Communication Skills:प्रभावी संवाद कौशल्ये कोणती?ह्यांच्याशिवाय तुम्ही जगात टिकूच शकणार नाहीत!!

Soft Skills:सॉफ्ट स्किल्स काळाची गरज! शिकून घ्या नाहीतर मागे पडाल!

Presentation Skills: सादरीकरण कौशल्ये व त्याचे महत्व (व ते सुधारण्यासाठी करा ह्या टॉप 7 टिप्स फॉलो)

मराठीतले माझे लेखन कौशल्ये मी कसे सुधारू?How to improve writing skills in marathi

लेखनाचा उपयोग प्रत्येकवेळी होतो, आणि त्यात जर तुम्ही लेखन शैलींचा वापर केलात तर त्या तुम्हाला दहावी ची बोर्ड परीक्षा असो किंवा UPSC च्या परीक्षेत मराठी एक ऑप्शनल विषय म्हणून घेतलेला असू. 

आपण ह्या मराठी लेखन कौशल्य  सुधारण्याच्या गोष्टीला चार विभागात वाटू! 

१. एक जर तुम्हाला लेखक व्हायची आवड असेल किंवा एक विशिष्ट शैलीतून दुसऱ्या शैलीत लिहावे वाटत असेल तर. 

२. १० वि च्या बोर्डमध्ये मराठी विषय असेल तर?

३. UPSC मध्ये मराठी हा विषय ऑप्शनल असेल तर?

वरील तीनही मुद्यांमद्धे उत्कृष्ट कामगिरी करायची असेल तर खालील गोष्टी न चुकता शिका. व प्रॅक्टिस करा

१. तुमची कल्पनाशक्ती मजबूत हवी – कल्पनाशक्ती मजबूत बोलण्याचे कारण म्हणजे. तुम्ही कोणतीही शैली बघा. मन वळवणारी, कथात्मक, विवरणात्मक,वर्णनात्मक प्रत्येक वेळी तुम्हाला कल्पनेचा आधार घेऊन लेखन करावे लागत आहे. जे के रोलिंग यांचे उदाहरण बघितले तर प्रत्येक टप्यात कल्पना करून त्यांनी जगत विख्यात हॅरी पॉटर अशी कादंबरी लिहिली . ते मजबूत करण्यासाठी तशी पुस्तके वाचा, चित्रपट बघा, लेख वाचा, क्रिएटिव लोकांशी बोला, ऑनलाइन असे मित्र बनवा जे तुम्हाला वेगवेगळे अनुभव सांगतील. ज्यातून तुम्ही तुमची चित्रे रंगवाल.

Writing skills types:तुमच्या वाचकांना गुंतवून ठेवण्यासाठी 4 लेखन शैलींमध्ये प्रभुत्व मिळवा

2.खूप वाचन करा: तुमच्या वाचनाला मर्यादित ठेवू नका. Stephen King अमेरिकेतील नावाजलेले लेखक ज्यांनी रहस्य (suspense), गुन्हे(Crime), विज्ञान-कथा(science-fiction), कल्पनारम्य आणि रहस्य(fantasy and mystery) या विभागात खूप मोठे योगदान दिलेले आहे. त्यांचे एक Quote आहे”जर तुम्हाला लेखक व्हायचे असेल तर तुम्ही इतर सर्वांपेक्षा ह्या दोन गोष्टी केल्या पाहिजेत: भरपूर वाचा आणि भरपूर लिहा”

Writing skills types:तुमच्या वाचकांना गुंतवून ठेवण्यासाठी 4 लेखन शैलींमध्ये प्रभुत्व मिळवा

३. लेखनात स्पष्टपणा,योग्य व्याकरण: तुम्ही तुमच्या लेखनात व्याकरणातील चुका टाळायला हव्यात. जर पायाच मजबूत नसेल तर घर कोसळून पडणारच! तसेच योग्य व्याकरण हे तुमच्या लेखनासाठी फ्रेमवर्क म्हणून काम करते. ज्या व्याकरणामुळे तुमच्या लेखनाला अर्थ मिळून ती समोरच्या पर्यंत स्पष्टपणे पोहचतात. 

Writing skills types:तुमच्या वाचकांना गुंतवून ठेवण्यासाठी 4 लेखन शैलींमध्ये प्रभुत्व मिळवा

४. शब्दसंग्रह निर्माण करा: मराठी वर्तमानपत्रे, मासिके किंवा कादंबऱ्या वाचून तुमचा मराठी शब्दसंग्रह वाढवा. दररोज नवनवीन शब्द शिका आणि ते तुमच्या लेखनात वापरण्याचा सराव जरूर करा.अशा ॲप्सचा वापर करा जे तुमच्या बुद्धीत नवीन आणि अनोख्या शब्दांची भर घालेल. उदा; Learn Easily यूट्यूब चॅनल, मराठी डिक्शनरी, यांचा वापर करा.

Writing skills types:तुमच्या वाचकांना गुंतवून ठेवण्यासाठी 4 लेखन शैलींमध्ये प्रभुत्व मिळवा

५. नियमित लिहा: बऱ्याचदा प्रॅक्टिस नेच अर्ध्या गोष्टी मिळून जातात. लिखाण केल्यानेच लिखानातली चूक कळू शकते. मराठी जर्नल किंवा ब्लॉग लिहायची सवय ठेवा. तुमच्या आवडीच्या विषयांवर लघुकथा, कविता किंवा निबंध लिहा. तुम्ही जितके जास्त लिहाल तितके तुम्ही अधिक आत्मविश्वासी व्हाल.

Writing skills types:तुमच्या वाचकांना गुंतवून ठेवण्यासाठी 4 लेखन शैलींमध्ये प्रभुत्व मिळवा

लिखाण करताना ह्या गोष्टी ठेवा लक्षात:

१) तुमचे लेखन अधिक थेट आणि प्रभावी बनवण्यासाठी तुम्ही काय व कसे बोलाल याची योजना करा.

२) शब्द जपून वापरा आणि वाक्ये लहान ठेवा आणि मुद्द्याला धरून लिहा.

३) लोक कन्फ्युज होणार असतील तर “फॅन्सी” शब्द टाळा. त्याऐवजी स्पष्टतेसाठी प्रयत्न करा.

४)तुम्हाला नुसत लिहायच नाही आहे तुम्हाला उत्तम लिहायच आहे अस स्वतच्या मनाशी घट्ट करा.

Don’t/करू नका:

१) तुमचं लिखाण झाल्यावर लगेच प्रसिद्ध करू नका. दोन-तीन वेळा वाचून खातर जमा करा. 

२) तुम्ही सुरवातीला लिहिलेलाच ड्राफ्ट योग्य होता असे स्वताला भासवू नका. 

Leave a Comment Cancel reply

Save my name, email, and website in this browser for the next time I comment.

IMAGES

  1. Essay Writing In Marathi In 2020 Easy Method For Exams

    essay writing meaning for marathi

  2. Marathi Nibandh Lekhan || Essay writing Marathi || best handwriting in Marathi

    essay writing meaning for marathi

  3. Marathi Essay

    essay writing meaning for marathi

  4. Marathi Essay on Ghadiche Mahatva/Marathi Handwriting/

    essay writing meaning for marathi

  5. Marathi Essay 2020||Marathi Essay Writing||मराठी निबंधलेखन २०२० || MPSC Essay Writing

    essay writing meaning for marathi

  6. Essay Writing In Marathi In 2020 Easy Method For Exams

    essay writing meaning for marathi